
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर (प्रतिनिधी) – राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेचा कर्नाटक व तेलंगण राज्याच्या सीमेवर असलेल्या देगलूर मध्ये प्रवेश झाला. दोन राज्यांच्या सीमेवर असणारे देगलूर हे महाराष्ट्रातील पहिले शहर असल्याने एखाद्या नवीन नवरी सारखे देगलूर शहराला सजवले गेले. | महाराष्ट्रातील पहिल्या प्रवेशामुळे काँग्रेसची वरिष्ठ मंडळी देगलूर मध्ये आली. यांच्या अतिथी गृहाची व्यवस्था म्हणून देगलूर महाविद्यालय देगलूरचे मैदान निवडले गेले. यामध्ये ठीक ठिकाणी मोठमोठी शौच खड्डे खोदली. शिवाय सर्व मैदानावर छोटी मोठी खड्डे सुद्धा खोदली गेली. शेवटी देगलूर येथील भारत जोडो यात्रा संपन्न होऊन पुढे जाताच संपूर्ण खड्डे बुजवून मैदान जशास तसे करण्याची हमी सुद्धा काँग्रेस पुढाऱ्यांनी संबंधित कॉलेज प्रशासनाला दिली होती. मात्र सध्या पोलीस भरती सुरू आहे. मुले मैदानावर सरावासाठी जात आहेत. मात्र मैदानावर पडलेल्या छोट्या-मोठ्या खड्ड्यामुळे त्यांना सराव करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भारत जोडो यात्रेमध्ये महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे रोजगाराचा ! रोजगार प्राप्त करण्यासाठी युवक मोठ्या प्रमाणात धडपडत आहेत. मात्र | देगलूरच्या काँग्रेस पुढाऱ्यांनी गरज सरो वैद्य मरो अशीच भूमिका | महाविद्यालयास दाखवली. युवकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या देगलूर काँग्रेसला जाग येणार का? तात्काळ मैदान सुरळीत करून देणार का? अशी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केली आहेत..