
दैनिक चालु वार्ता ता.मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागात कार्यरत असणारे प्रा.डॉ. चांदोबा कहाळेकर यांची अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या जिल्हा संघटनमंत्री म्हणून निवड करण्यात आली . परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष नरेंद्र पाठक व महामंत्री डॉ. बळीराम गायकवाड यांच्या उपस्थितीत घोषणा झाली .
या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , उपप्राचार्य एस.बी.बळवंते , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी , महाविद्यालयीन परिवारातील प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले .