
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी-लक्ष्मण कांबळे
किवळा येथील युवकांनी चोरटे
पळून जात आसतांना पाठलाग करून पकडले .
चोरटे पळून जात असतांना कॅनॉलमध्ये पडले आणि युवकाच्या हाती लागले.
………………………………..
उस्माननगर:- लोहा तालुक्यातील किवळा शिवारात दुचाकीवरुन शेताकडे जात असताना माजी सरपंच प्रतिनिधीला दिवसाढवळ्या मारहाण करून त्यांच्या जवळील सोन्याची अंगठी व रोखरक्कम असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास किवळा शिवारात घडली.हे चोरटे विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरुन आले होते.दरम्यान गावाक-यांनी पाठलाग करून दोन चोरानां पकडून पोलीसाच्या ताब्यात दिले .या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून पोलीसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.
माजी सरपंच प्रतिनिधी साईनाथ गणपतराव पाटील टरके हे १९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या दरम्यान त्यांच्या शेताकडे जात असतांना विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी आवाज देवून गाडी थांबवण्यास सांगीतले गाडी थांबताच लाथा बुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली व हातातील सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी व त्याच्या जवळील रोख रक्कम आठ हजार रूपये असा एकूण ३८ हजाराचा मुद्देमाल हिसकावून घेऊन पळून जात असताना साईनाथ पाटील टरके यांनी आरडाओरड केल्याने दुसर्या शेतात काम करणारे शेतकरी व युवकांनी दोन लुटारूंचा पाठलाग केला .लोक पाठलाग करत असल्याचे पाहून ते चोरटे घाबरले व भयभीत होऊन घाईगडबडीत पळून जात असतांना बाजूच्याच कॅनॉल मध्ये मोटारसायकलसहीत पडले व त्याचा पाठलाग करून ,त्याच्यावर झडप घालून त्यांना पकडून सोनखेड पोलिस स्टेशनला महिती देण्यात आली.ही बातमी समजताच सोनखेड पोलिस ढाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल रानबा फड यांनी घटनास्थळावरून चोरट्यांना ताब्यात घेतले .या प्रकरणी साईनाथ पाटील टरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मेहंदी हसन पिता बाबर अल्ली ( ४३ ) व जावेद जाफरी पिता बालीअल्ली (३७ ) रा. हुसेन काॅलनी चिदरी रोड बिदर जि.बिदर (कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .या प्रकरणी पुढील तपास सोनखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भोसले हे करीत आहेत.
दिवसा चोरी होत असल्यामुळे किवळा व किवळा परिसरातील शेतक-यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.