
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
26 नोव्हें 2022
औरंगाबाद – भारतीय जनविकास मंच आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे संविधान गौरवदिनी प्रा. अंकुश दि. शिंदे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. त्यांनी अनेक शाळा महाविद्यालयात तसेच सेवाभावी संस्था मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना समपुदेशनाचे म्हणजेच ज्ञानदान करण्याचे कार्य केले आहे सोबतच स्व. लिखित “आता मी यशश्वी होणार” त्याचबरोबर “यशवंती” या चित्रपटातून आणि साप्ताहिक “माझा स्टुडंट” या वृत्तपत्राच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आज संविधान गौरवदिनी “मराठवाडा भूषण” पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.