
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
जोमेगाव :- लोहा तालुक्यातील जोमेगाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फोटो जाळून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.जोमेगाव येथील नागरिकांनी कोश्यारी महाशय नेहमी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करून बोलत आहेत.त्यांचे वय झाले आहे त्यांना अगोदर महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून देण्यात यावे अशी विनंती शासनाकडे केली आहे.अन्यथा महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही, उपस्थित नागरिकांनी म्हटले आहे.यावेळी आदिनाथ पाटील शिंदे (माजी सरपंच), लक्ष्मण आनंदा शिंदे, लक्ष्मण मुर्ताजी शिंदे, राहुल दशरथ पवार, नारायण कोंडीबा शिंदे, दत्ता कोंडीबा शिंदे,हनूमंत बळीराम शिंदे, संभाजी बळीराम शिंदे, बालाजी मारूती शिंदे, जळबा माधवराव शिंदे, प्रभाकर संभाजी शिंदे, सुनील तारू, आनंदा पाटील जाधव आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.