
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
नशाबंदी महाराष्ट्र राज्य मंडळ मुंबई शाखा कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कवि संमेलन शाहू स्मारक दसरा चौक कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कविसंमेलनाचे उद्घाटन अभिनेत्री पुजा पवार सांळूंखे मुंबई यांचे हस्ते करणेत आले.संमेनाच्या अध्यक्षा कवियत्री प्रा.डाॅ. अलका नाईक .माणस तज्ञ.व समाजसेवी का यांनी भूषवले.तर प्रमुख उपस्थीत म्हूणन वर्षा विद्या विलास सरचिटणीस नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि
अमोल मडामे संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र हे लाभले होते.प्रास्ताविक व स्वागत जिल्हा संघटक सुरेश सकटे व्यसनमुक्ती प्रचारक महाराष्ट्र. यांनी केले. तसेच अमोल मडामे यांनी संविधान वाचन केले. कविसंमेलन अध्यक्षा,प्रा.अलका नाईक,अभिनेत्री पुजा पवार सांळूखे वर्षा विलास यांनी आपले अनमोल विचार मांडले.
सुरेश सकटे यांना पुरस्कार देऊन गौरवणेत आले.
कविसंमेलनात अनेक कविनी व्यसनमुक्तीवर आधारीत काव्यवाचन सादर कले.सदर संमेलनात नशाबंदी मंडळाचे समाजपरिवर्तन घडवणेचे कार्य दिसून आले.
यात कवि सरकार इंगळी,बाळासाहेब गिरी नाशिक,आंनंद गायकवाड,चंद्रकांत जोगदंड, सौ,योगिता कोठेकर सर्व पुणे.किशोरी पाटील विहार,माणिक पाटील गोडसे, प्रकाश बोंगाळे सातारा ,गीतकार रघूनाथ कापसे मनपाडळी,उर्मिला तेली कोल्हापूर,सुवर्णा पवार इंचल.वृषाली पाटील,सुलक्षणा सोनवणे लातूर समिक्षा गोसावी,
मेघा शहा,व इतर अनेक कविनी सहभाग नोंदवला.