
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर :- गुरुगोविंद सिंगजी शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब समर्थक तथा पत्रकार स्वप्निल गव्हाणे आंबेसांगवीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात फळे वाटप कार्यक्रमास शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी दवाखान्यातील रुग्णांची आशाताईंनी आस्थावीकपणे चौकशी केली व संबंधित डॉक्टरांना रुग्णांकडे लक्ष देण्याचे संदर्भात चर्चा केली याप्रसंगी स्वप्निल गव्हाणे यांचा रुग्णालयात वाढदिवस साजरा करण्यात आला आणि शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आशाताईंचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर राजेश आंबुलगेकर, डॉ.आपटे मॅडम, प्रगती निलपत्रे,स्वप्निल गव्हाणे,बालाजी नीलपत्रे, पत्रकार यज्ञकांत कोल्हे, मंजुषा चव्हाण, संतोष चव्हाण, सुरेश दुबे, माधव डोमपल्ले, दयानंद दुबे, पत्रकार चंद्रभान सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, उत्तम जोगदळे, संतोष वाघमारे, ज्ञानेश्वर ढाकणीकर, सुशील दगडे, पत्रकार अजय दुधाडे, हर्षद रावत, उस्मान चाऊस,शेख सलीम सह कार्यकर्ते आणि रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते…!!!