
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-
देगलूर येथील जुने तहसील कार्यालया जवळील सिंधू महाविद्यालय येथे आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक बारा वाजता संविधान गौरव दिवसाच्या समारोपच्या निमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सविधान दिन व महात्मा फुले यांची पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य.ए बी, सीताफुले सर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, डॉ. रामचंद्र गायकवाड सर ,हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालय अर्धापूर, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. मिलिंद राजुरकर, सौ प्राध्यापिका अनुराधा गंधारे मॅडम,
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी संविधान गौरव दिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध व वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संविधान गौरव व समारोपाच्या निमित्ताने प्राध्यापक डॉ. गायकवाड म्हणाले की, भारतीय संविधानाने मानवाला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य , व तसेच भारतीय संविधानामध्ये असलेल्या कायद्याची आधुनिक काळामध्ये खऱ्या अर्थाने गरज आहे आणि संविधानाच्या नीती मूल्याची खऱ्या अर्थाने पेरणी 21 व्या शतकामध्ये सर्व समाज अंगीकारला पाहिजे तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय संविधान आपणाला समजून शकेल अशी प्रतिपान डॉ.
गायकवाड सर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजूरकर सर यांनी केले, तसेच महात्मा फुले यांच्या जीवनावर काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. यावेळी हे कार्यक्रम घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख प्रा. वजिरे सर, प्रा. जी एम जाधव, यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षक कर्मचारी, विद्यार्थिनी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, या कार्यक्रमाचा सुरेख असं सूत्रसंचालन प्रा भीमराव दिपके, मान्यवरांचे ओळख व परिचय, प्रा. वजीरे सर यांनी करून दिले. व तसेच अध्यक्ष समारोपात प्राचार्य सीताफुले सर यांनी म्हणाले की भारतीय संविधानाशिवाय या देशांमध्ये खऱ्या अर्थाने मानवाला आपले विचार व्यक्त करता येत नाही, त्यासाठी तरुणांनो संविधानाचा अभ्यास करा असे प्रतिपादन केले, या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुकालेमॅडम यांनी केले.