
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर :- येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात व जवाहरलाल नेहरू वि.वसतिगृहात तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे भारतीय सविंधान दिन विद्यार्थ्यी व बाल गोपाल यांच्या उपस्थितीत संविधानाचे वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
२६ जानेवारी १९४९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद याना घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला हे सविंधान समता,बंधुत्व, न्याय ,स्वातंत्र्य, बंधूभाव टिकून रहाण्यासाठी देशाला सविंधान अर्पण केले तो दिवस म्हणून पूर्ण देशात सविंधान दिन उत्साहात साजरा केला जातो .
ग्रामपंचायत कार्यालय उस्माननगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड, उपसरपंच बाशीद शेख, ग्रामसेविका डी.शिंदे अमिनशहाॅ फकिर , अशोक काळम, शिवशंकर काळे,कमलाकर पाटील शिंदे, गंगाधर भिसे,नरेश शिंदे,दत्ता घोरबांड, मुख्याध्यापक राहूल सोनसळे,गोविंद पोटजळे, वारकड, संजय भिसे,परमेश्वर पोटजळे,सद्दाम पिंजारी,यांच्यासह सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यी व समस्त गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यांनी सामूहिक सविंधान प्रस्ताविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात सविंधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राहूल सोनसळे ,पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे,उपाध्यक्ष माणिक भिसे,कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे याच्या सह सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर व सविंधानपर भाषण केले .
जवाहरलाल नेहरू वि.वसतिगृहात
पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सविंधान प्रस्तावनेची सामुदायिक वाचन करण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष माणिक भिसे व जवाहरलाल ने.विद्यार्थ्यी वसतिगृहाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे व विद्यार्थ्यी उपस्थित होते.