
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आल्यापासून आमच्या राज्यातील महापुरुष व आमच्या राज्याची अस्मिता याबाबत वारंवार पुन्हा पुन्हा वादग्रस्त व अवमान कारक वक्तव्य करत आहेत.हे राज्यपाल महोदय आपल्या भाषणातून आमचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल अवमान कारक वक्तव्य करत आहेत.व आमच्या भावनेसी कोणता खेळ खेळत आहेत.हे समजत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या राज्यपालांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.या राज्यपालामुळे महाराष्ट्रामध्ये दंगल निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.तरी अशा राज्यपालांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल ठेवणे उचित होणार नाही.त्यांना तात्काळ राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी.अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेचा मोठा उद्रेक होऊ शकतो.आम्ही राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो.त्यांना तात्काळ राज्यपाल पदावरून हटविले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनात काही वाईट घटना घडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.याची गांभीर्यपूर्वक मा. राष्ट्रपती महोदयांनी नोंद घ्यावी ही विनंती केली आहे.तहसील कार्यालयामार्फत निवेदन देऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटविण्याची मागणी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले, जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे , जिल्हा सचिव श्रीकांत पाटील बस्वदे , महीला जिल्हाध्यक्ष पार्वतीताई केंद्रे,कंधार तालुका अध्यक्ष किरण गायकवाड, कार्यकारिणी सदस्य साईनाथ गोडबोले यांनी राष्ट्रपती यांच्याकडे मागणी केली आहे.