(खेड तालुका प्रतिनिधी)-:विजयकुमार जेठे
दरवर्षी ३ मार्च रोजी जगभरात जागतिक वन्यप्राणी दिन साजरा केला जातो. हा दिवस United Nations यांनी घोषित केला आहे. वन्यजीवांचे संरक्षण, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संतुलन याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
मात्र प्रत्यक्ष वास्तव पाहिले, तर एक कटू सत्य समोर येते —
वन्यप्राणी वाचवण्याची भाषा मोठी, पण कृती मात्र अत्यंत कमी!
जंगल संपत आहेत… प्राणी कुठे जाणार?-
विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे. रस्ते, उद्योग, प्रकल्प यासाठी निसर्गाची निर्दयी कत्तल सुरू आहे.
जंगलच नष्ट झाले, तर वन्यप्राणी कुठे राहणार?
त्यामुळेच बिबट्या, रानडुक्कर यांसारखे प्राणी गावात शिरू लागले आहेत आणि मग त्यांनाच “धोकादायक” ठरवले जाते.
प्रत्यक्षात माणूस त्यांच्या घरात घुसला आहे, हे आपण विसरतो! भिमा नदी आणि कचऱ्याचा प्रश्न – वन्यजीवांसाठी घातक-
भीमा नदी परिसरात वाढलेले प्रदूषण ही गंभीर बाब आहे. राजगुरुनगर परिसरात नदीपात्र आणि पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, ओला कचरा आणि घाण साचलेली दिसते.
हा कचरा फक्त मानवी आरोग्यासाठीच नाही, तर पक्षी, जलचर आणि इतर वन्यजीवांसाठीही प्राणघातक ठरत आहे.
प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक प्राणी मृत्युमुखी पडतात, तर पाण्याचे प्रदूषण त्यांच्या जगण्यावर परिणाम करते.
नदी कचराकुंडी झाली, तर पर्यावरण कसे टिकणार?
बेकायदेशीर शिकार – अजूनही सुरूच
कायद्यांची अंमलबजावणी असूनही वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार थांबलेली नाही.
वाघ, बिबट्या, हरीण यांसारख्या प्राण्यांचे अस्तित्व अजूनही धोक्यात आहे.
कागदावर संरक्षण, पण प्रत्यक्षात विनाश — हे वास्तव आहे.
हवामान बदल आणि वाढती आपत्ती
वाढते तापमान, आटणारे पाण्याचे स्रोत आणि बदलते हवामान यामुळे वन्यजीवांचे जीवन अधिक कठीण झाले आहे.
जंगलातील आगी, दुष्काळ आणि पाण्याची टंचाई यामुळे अनेक प्राणी मृत्युमुखी पडत आहेत.
फक्त दिवस साजरा करून काही बदलणार नाही
