
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अमरावती,भातकुली,मोर्शी आणि तिवसा येथील शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी पुरविण्यात आलेली रोहित्र हे नादुरुस्त असल्याच्या तक्रारी अनेक शेतकरी बांधवांनी केल्या होत्या.अखेर अमरावती मधील राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना शेतकरी आंदोलनाने चांगलाच शॉक दिला.शेतकऱ्यांचा कृषि विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासोबत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करीत असल्याची लेखी हमी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना द्यावी लागली असल्याने आंदोलनाला यश मिळाले.
११ के.व्ही. कृषि विज वाहीनीवर बिघाड झाल्यास जेवढा काळ विज पुरवठा खंडीत होता,तेवढा वेळ वाढीव विज पुरवठा करण्याबाबत सर्व उपकेंद्राना सुचना देण्यात आल्या.रोहीत्र नादुरुस्त झाल्यास सदर रोहित्रावरील ८०% शेतकऱ्यांनी चालु विज देयकाचा भरणा केल्यास, सदर रोहीत्र ७ दिवसाच्या आत बदलवुन देण्यातबाबत सर्व विभागाला सुचना दिल्या आहेत.नविन कामे व दुरुस्तीची कामे फक्त लोडशेडींग काळातच याची अंमलबजावणी करण्यात येईल.सदोष असल्यास १० दिवसात तपासून मिटर उपलब्धतेनुसार बदलवुन देण्यात येईल अशा चारही मागण्या मान्य केल्याची लेखी हमी अमरावती मधील राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यकारी अभियंता यांनी दिली.