
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर;दि.23/11/2022 वार बुधवार रोजी जिल्हा क्रिडाधिकारी लातूर यांनी आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्ह्यातील विविध शाळांनी यात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतून ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल च्या दोन विध्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी 17 वर्ष वयोगटातून सर्वप्रथम येण्याचा मान क्षितिज देवशेटवार तर सर्वद्वितीय येण्याचा मान इशांत सोनार वर्ग 9 वी यांना मिळाला,
त्यांच्या या निवडी बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रमेशजी बिरादार सर, श्री. सुजीत बिरादार सर, प्राचार्या पल्लवी जगताप, रामेश्वर सगरे सर व शाळेतील सर्व शिक्षकव पालकांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शूभेछा दिल्या. त्यांना क्रीडा शिक्षक विठ्ठल गुरमे व विशाल कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.