
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील शिवणी येथील गरीब शेतकरी कुटुंबातील अशोक बाबाराव मोगावार या तरुणाने जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. त्याचे हे यश ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यातही
गुणवत्ता ठासून भरली असून, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गर….महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील शिवणी येथील अशोक बाबाराव मोगावार यांचे शालेय शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण होट्टल येथील जागृती विद्यालयात झाल्यानंतर त्याने पुणे येथे राहून एमपीएससीची तयारी केली. आपल्या गरीब परिस्थितीला त्याने शिक्षणाच्या आड न येऊ देता त्यावर मात करून उपरोक्त यश संपादन केले असून, त्याची मंत्रालयात कक्षाधिकारी म्हणून निवड झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले आहे. जि. प. शाळा शिवणी व ग्रामपंचायत कार्यालय, यांच्या वतीने अशोक मोगावार, त्याचे आई-वडील बाबारावमोगावार व राचाबाई मोगावार यांचा गौरव केला. यावेळी बसवराज तंगावार, रमेश शिवनीकर, अर्जुन इबितदार, अनिता शिवनीकर आदी उपस्थित होते.