
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर :- समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर ( मोठी लाठी ) ता.कंधार येथील मुलींनी तालुकास्तरीय वकृत्व व निबंध स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन तालुकास्तरीय स्पर्धेत बाजी मारली आहे.
मराठवाड्यात १७ सप्टेंबर २०२२ ते १६ सप्टेंबर २०२३ या दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव वर्ष विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने मा. विभागीय आयुक्तांनी सुचवलेल्या कार्यक्रमांतर्गत व नांदेड जिल्ह्याच्या लोकप्रिय, कर्तव्यदक्ष, पुरस्कार प्राप्त सीओ अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या सूचनेनुसार उस्माननगर बीट अंतर्गत केंद्रप्रमुख जयवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील स्पर्धेचे आयोजन केद्रावर करण्यात आले होते. उस्मान नगर बीट अंतर्गत येणाऱ्या 9 शाळेतील पहिली ते बारावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी १८ तसेच २४ नोव्हेंबर रोजी बीट स्तरावर वकृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत तीन गटाची विभागणी करण्यात आली होती.त्या प्रत्येक गटातून दोन स्पर्धक विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर साठी निवड करण्यात आली होती.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हा परिषद नांदेड द्वारा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य व त्यांच्या आंदोलनाची गाथा घरा घरापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीस्तरीय व तालुकास्तरीय वक्रत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत प्रत्येक शाळेतील ३री ते ५ वी , ६ वी ते ८ वी , ९ वी ते १२ वी पर्यंत असे तीन गटाची विभागणी करण्यात आली होती.प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व सहशिक्षकांनी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी केली होती.कंधार तालुक्यात दिनांक 24/11.2022 ते 26 11 2022 या कालावधीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव निमित्त निबंध वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक केंद्रातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यी व विद्यार्थीनींनी तालुक्यास्तरीय स्पर्धेत भाग घेतला यामध्ये उस्मान नगर मोठी लाठी तालुका कंधार येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलींनी वकृत्व व निबंध स्पर्धेत यश मिळून शाळेचे नाव तालुक्यात चमकविले. यामध्ये निबंध स्पर्धेत गट ३ रा मधून सर्वप्रथम प्रियंका परमेश्वर घोरबांड ,तर कल्याणी विलास कौसल्या व वक्तृत्व स्पर्धेत सानिका रविराज लोखंडे यांनी तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या स्पर्धेत घवघवीत यश मिळवून मुलींनी शाळेचे नाव चमकाविल्या बध्दल संस्थेचे संचालक कार्यकारी मंडळ, कंधार पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मेटकर, केंद्रप्रमुख जयवंतराव काळे, मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड, पर्यवेक्षक राजीव आंबेकर, शिक्षकवृंद, कर्मचारी, पत्रकार यांनी अभिनंदन केले आहे