
दैनिक चालु वार्ता मुखेड ता. प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
पुणे येथील ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी या संस्थेच्या वतीने नांदेड भूषण पुरस्कार मुखेडचे डॉ.रणजित काळे यांना नांदेड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृह येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेला नांदेड भूषण पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते डॉ. रणजित काळे यांना देण्यात आला आहे. यावेळी डॉ. काळे यांनी सहपरिवार पुरस्कार स्वीकारला आहे.
आरोग्यरत्न डॉ. रणजित काळे यांनी डोंगराळ भाग असलेल्या मुखेड तालुक्यात रुग्णांना २४ तास सेवा देणारे एकमेव डॉक्टर आहेत. त्यांनी कोरोना काळात खूप उत्तम सेवा मुखेड करांना दिली आहे. तालुक्यातील रुग्णांची सेवा करत अल्पावधीतच डॉ. काळे खूप नावलौकिक झाले आहेत. त्यांना यापूर्वी २०१८ साली महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषदेच्या वतीने आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच राजमुद्रा ग्रुपच्या वतीने कोरोना वॉरियर्स हा सुद्धा पुरस्कार देण्यात आला आहे. कोरोना काळात उत्तम सेवा दिल्याबद्दल आरोग्यरत्न डॉ. रणजित काळे यांना पुणे येथील ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनच्या वतीने नांदेड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार प्राप्त होताच आरोग्य विभागात, समाजात, तसेच मित्रपरिवार ,पदाधिकारी , पत्रकार व इतर सर्व स्तरातुन अतिशय आनंदाचे ,जल्लोशाचे वातावरन निर्माण झाले असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .