
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे —-————————————
पुणे :काल रात्री साडेतीनच्या सुमारास तारांगणा हाऊसिंग सोसायटी फुरसुंगी रोड, हरपळे वस्ती, फुरसुंगी येथील ग्राउंड फ्लोअर वरील रामदेव किराणा सुपर मार्केट या दुकानात आग लागून दुकानातील किराणामाल फर्निचर फ्रिज व इतर ग्रह उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले आहे त्यामुळे दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे घटनास्थळी अग्निशामक अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग विझवण्यात आली आहे.
विशेष बाब अशी की सोसायटी मधील फायर यंत्रणा एकदम निकामी होती त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागून दुकानातील सर्व माघ व फर्निचर सह इतर ग्रह उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
त्याचबरोबर महानगरपालिकेतील यंत्रणा व स्थानिक राजकीय कार्यकर्ते कुणीही भेट दिली नाही.