
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पुणे दि.२- पीक विमा सप्ताहानिमित्त प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत जनजागृती करण्यात येत असून आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनी प्रचाररथाचा शुभारंभ राज्याचे कृषि सहसंचालक तथा मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मध्यवर्ती इमारत येथे करण्यात आला.
यावेळी कृषि उपसंचालक अरुण कांबळे, कंपनीचे व्यवस्थापक गोपाळ सोनवणे व तनुज नेगी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत प्रचाररथाचा शुभारंभ राज्याचे कृषि संचालक कृषि प्रक्रिया सुभाष नागरे व कृषि सहसंचालक पांडुरंग शेळके यांचे हस्ते साखर संकुल येथे करण्यात आला.