
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर ( प्रतिनिधी)-आज दिनांक ३ डिसेंबर २२ रोजी विद्यालयात गीता जयंती व तसेच योगी श्री अरविंद सार्थ जन्मशतीनिमित्त विद्यालयात श्रीमद्भगवद्गीता पठणाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यालयाच्या शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. शीलाताई अटकळीकर तसेच विद्यालयाचे सदस्य सिद्धार्थभाऊ आलुरकर, विवेक चिद्रावार,पत्रकार मनधरने सर विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगांवकर व आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या वक्त्या सौ.प्रियंका चिद्रावार या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णप्रतिमा, योगी अरविंद व भारत माता यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देगांवकर यांनी सादर केले व पद्द सुरेखा तोटावार यांनी सादर केले.
गीता जयंती का साजरी केली जाते व तसेच गीतेचे महत्व प्रियंकाताई यांनी विद्यार्थ्यांना सांगितले
गीता हे एक ग्रंथ नसून ते एक जीवन ग्रंथ आहे तसेच केवळ अर्जुनाला श्रीकृष्णांनी गीता सांगितले नसून अर्जुन हे केवळ निमित्त होते .संपूर्ण जगाला मी कसा असायला पाहिजे?याचे महत्त्व गीता आपल्याला सांगते म्हणून आपण गीता जयंती साजरी करत असतो.
*’इच्छा तिथे मार्ग’ यासाठी आपण केवळ बाह्य सौंदर्याचा प्रयत्न न करता मी माझ्या अंतर्मनाला सुंदर घडवायला पाहिजे हे गीता आपल्याला सांगत असते असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जिभेवर संस्कार करण्याचे सामर्थ ज्यात आहे ती म्हणजे गीता होय* अशी सुंदर व्याख्या गीते विषयी त्यांनी सांगितले. गीतेचे महत्व पटवून देत असताना व त्यांनी वेगवेगळे उदाहरण देऊन मुलांना गीतेचे महत्व पटवून दिले.
यानंतर स्मिता कुलकर्णी यांनी अध्याय बारावा व अध्याय पंधरावा याचे पठण केले विद्यार्थ्यांनी व सर्व सहकाऱ्यांनी सामूहिक अध्याय पठण करून त्यात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी अर्चना सुरशेटवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.