
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी -संघरक्षित गायकवाड
मुखेड तालुक्यातील गरीब व गरजू मागासवर्गीय शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन या योजने अंतर्गत सिंचन विहीरीचा लाभ घेण्यासाठी आँनलाईनव्दारे अर्ज केल्यानंतर त्या शेतकऱ्याला विहीरीचा लाभ घेण्यासाठी तुमचे अर्ज मंजूर झाले म्हणून मंजूर लाभधारकांची यादी गेली तीन ते चार वर्षा पासून पंचायत समिती मध्ये न लावताच परस्पर यादी मध्ये नाव आले आहे.किंवा येणार आहे असे सांगून पैशाची मागणी करत आहे असे लाभधारक दबक्या आवाजात सांगत आहेत .
मंजूर यादीत लाभधारकांचे नाव आले परंतु तुला या पुर्वी म्हणजे पंधरा वर्षा पूर्वी तु लाभ घेतलास तुला देता येत नाही अशी उध्दट भाषा लाभधारकांना बोलत आहे.ज्या लाभधारकांना विहीर मंजूर झाली आहे अशा लाभधारकांना मोजमाप देण्यासाठी त्याचे वेगळे पैशाची मागणी करत आहेत.
एक दिवस सुध्दा कार्यालयात उपस्थित
साईडवर आहे असे म्हणून वेळ मारुन नेतो जे लाभधारक आहेत त्यांना पहील्यांदाच सुचना दिली जाते कोणत्या नेत्याकडे किंवा कार्यकर्ते यांना भेटून बिलाविषयी चौकशी करायची नाही अशी स्पष्टपणे तंबी दिली जाते अशी लाभधारकांतून ऐकायला मिळत आहे.
अर्धे तुम्ही अर्धे आम्ही अशा तत्वावर बरेच लाभधारकांना बिल देण्यात आले
मुखेड तालुक्यातील बरेच लाभधारक या कृषी अधिकारी यांच्या वागण्याला व बोलण्याला कंटाळले आहेत.
या निर्ढावलेल्या कृषी अधिकारी पि.व्हि देशमुख पंचायत समिती मुखेड यांच्या गैरकारभाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी अन्यथा दि. २७ डिसेंबर जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हा कृषी कार्यालयातील कर्मचारी निरडे रिपब्लिकन सेनेच्या वत्तीने यांना देण्यात आले.
या निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे तालूका अध्यक्ष श्रावण नरबागे मंडलापूरकर पिराजी गवलवाड , खुशाल कोये , विठ्ठल पाळेकर, संपत कुंभारे, हाणमंत वाघमारे संजय सोनकांबळे केरुरकर , संजय सोनकांबळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.