
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:वीर सैनिक ग्रूप चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड ता. देगलूर च्या वतीने अंध विद्यालय मध्ये अन्नदान व मिठाई चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये वीर सैनिक ग्रूप चॅरिटेबल ट्रस्ट च्या सर्व पदाधिकारी व सुट्टीवर असलेल्या सैनिकांद्वारे पुढाकार घेऊन ग्रूप च्या ब्रिद व्याख्येनुसार “एक हात मदतीचा एक हात सुरक्षाचा” हा उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यातील सेवारत सैनिक देशाची सुरक्षा करत असताना देखील सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत ह्याच एक जिवंत उदाहरण आज समाजापुढे ठेवण्यात आले. सैनिक देश सेवा तर करतोच त्याच बरोबर समाज सेवा पण करू शकतो हे वीर सैनिक ग्रूप ने करुन दाखवले आहे. त्यासाठी या सैनिकांच जितक कौतूक कराव तेवढ कमीच असे उदगार ह्या काय॔क्रमाचे मुख्य अतिथी श्री तुळशीराम नरसिंगराव कार्ले सर (आदश॔ शिक्षक ) खानापूरकर, यांनी केले. त्याच बरोबर या कार्यक्रमा चे अध्यक्ष आणि
वीर सैनिक ग्रूप देगलूर चे उपाध्यक्ष मा. डॉ. श्री रविजी काळे (अस्थिरोग तज्ञ) साहेब आणि मुख्य अतिथी यांच्या शुभहस्ते मुलांना जेवण व मिठाई वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा मध्ये वीर सैनिक ग्रूप देगलूर चे मार्गदर्शक सुभेदार महेश देवापूरकर (सेवानिवृत्त) साहेब ,वीर सैनिक ग्रूप चे ता.सचिव श्री संतोष मनधरणे, आणि वीर सैनिक ग्रूप चे ता.कार्यकारी अध्यक्ष श्री इर्शाद पटेल, सैनिक इरवंत भंडरवार, सैनिक चक्रधर तडकोले, सैनिक शिवराज जांभळीकर , श्री संजय जोशी, कोकणे सर,वीर सैनिक ग्रूप चे समस्त परिवार आणि मित्र मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमा चे नियोजन करण्यासाठी वीर सैनिक ग्रूप चे ता. अध्यक्ष सुभेदार श्री संतोष केंचे (सेवानिवृत्त) साहेब, रुपेश बतलवाड, दतात्रे मलगिरवार यांचे पण सिहांचा वाटा आहे असे मत सुभेदार महेश देवापूरकर साहेबांनी केले.