
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मुखेड :-
मुखेडचे भुमिपुत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू, आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. मायबोली मराठी परिषद मुखेड व सर्व राजकिय पक्षाच्या वतीने जि .प .हायस्कूल मुखेड येथील शोकसभेत सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जागतिक कीर्तीचे सर्पदंश चिकित्सक मराठवाडा भूषण दिलीप पुंडे उपस्थित होते. डॉ. पुंडे म्हणाले की , मुखेड सारख्या ग्रामीण भागात राहून त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कष्टातून शिक्षण घेतले. आपल्या बुद्धिमतेच्या व आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी अनेक मोठमोठी पदे चांगल्या प्रकारे भुषविली. कथा , कविता , कादंबरी , ललित गद्य , समीक्षालेखन अशा विविध वाङमय प्रकरात दर्जेदार साहित्य निर्मिती करून मुखेडचे नाव देशपातळीवर पोहचविण्याचे महान कार्य त्यांनी केले याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. अशा प्रतिभाशाली साहित्यिकाला आपण गमावून बसलो याचे दुःख होते अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक शंकर पाटील लुट्टे , शिवसेना तालुकाध्यक्ष नागनाथ लोखंडे , आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष विठठलराव इंगळे , काँग्रेस प्रवक्ता दिलीप कोडगीरे , सेवानिवृत्त मु.अ. संग्राम मस्कले , मायबोली मराठी परिषदेचे संस्थापक सचिव ज्ञानोबा जोगदंड ,अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे दिलीपराव देवकांबळे ,
. रामराव चव्हाण , साधना पेंढारकर मॅडम आदींनी डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या आठवणी सांगून श्रद्धांजली अर्पण केली. या श्रद्धांजली शोक सभेचे आयोजन नियोजन सुत्रसंचलन मायबोली मराठी परिषदेचे सचिव एकनाथ डुमणे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मायबोली मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव अंबुलगेकर यांनी केले. यावेळी शिक्षक नेते भागवत पाटील , दिपक लोहबंदे , भाजपा नेते शिवाजी कार्लेकर, लोकसंकेतचे संपादक नामदेव यलकटवार , सामना चे पत्रकार सुशिल पत्की, पत्रकार शरद जोगदंड, केंद्रप्रमुख शिवाजीराव कराळे , गजानन बंडे आदी सह बहुसंख्येनी मुखेडकर उपस्थित होते. दोन मिनिट स्तब्ध राहून सामुहिक श्रद्धांजली अर्पण करून शोकसभेची सांगता झाली.