
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
किनवट तालुक्यातील मौजे करंजी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मा. विलास भाऊ भालेराव यांचा दिनांक ०७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठिक सात वाजता करंजी येथे परिवाराकडून आणि विविध सामाजिक कार्यकर्ते कडुन वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केक कापून त्यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी विलास भाऊ भालेराव यांना सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले. वाढदिवसास जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,तरुन पत्रकार गजानन वानोळे रावसाहेब कदम विशाल भालेराव दशरथ आंबेकर तालुकाध्यक्ष तथा पत्रकार सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर अनेकांनी फोन, मॅसेज, सोसिअल मीडिया मार्फत मोबाईल वरुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच गरजू लोकांना गॅस सिलेंडर भरून देण्यात आले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते देविदास भालेराव राजरत्न भालेराव, सचिन शामराव इंगळे, ईश्वर अशोक भालेराव,रामदास गरुडकर, सुशील भगवान भालेराव, शुभम देविदास भालेराव, आकाश विठ्ठल कांबळे, प्रकाश गोविंद गरुडकर, अभिजीत प्रशांत भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.