
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी विनाकारण सीमावाद उकरुन काढून राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या बद्दल बुधवारी दुपारी कर्नाटक राज्याची बस शिवसेनेच्या कार्यकत्यांनी अडवली. जोपर्यंत सीमावाद संपुष्टात येणार नाही, तोपर्यंत देगलूर येथे कर्नाटकची बस येवू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला तसेच बोम्मई, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तेथील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सीमावादावर आक्षेपार्ह वाद निर्माण केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून