
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी,दि.०८/12/22 रोजी शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे.
शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील यांचे वडिल प्रगतशील शेतकरी होते. शेतीनिष्ठ म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते शेतकरी मारोतराव माणिकराव पाटील वय ९३ वर्षे यांचे अल्लापुर येथे आज सकाळी १०:०० वाजता वृद्धोपकाळाने निधन झाले आहे.
त्याचावर ०८/१२/२२ संध्याकाळी ४:०० त्यांच्या मूळ गावी अल्लापुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.