
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””””“””””””””””””””””””””””””””
परभणी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर विनय मून यांनी नियुक्ती झाली असून त्यांनी आजच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
यापूर्वी या पदावर कार्यरत शिवानंद टाकसाळे यांची मुंबईत मंत्रालयात बदली झाल्यामुळे या पदाची जबाबदारी प्रकल्प संचालिका रश्मी खांडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दरम्यानच्या काळात रश्मी खांडेकर यांनी विकासात्माक कामांना गती देण्यासाठी धोरणात्मक व नियोजनबद्ध असे निर्णय घेऊन दिलेली चालना कौशल्यपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणारे विनय मून यांना परभणी सारख्या निजामकालीन जिल्हा स्तरावर कार्य करण्याची दिलेली संधी विकासापासून कोसो दूर राहिलेली जिल्हा परिषद विकसनशील व धोरणात्मक नियोजनबद्ध ठरली जाईल का ती अर्ध्यावरच सोडून अन्य कुठे तरी बदलीची वर्णी लावून घेतली जाईल हे येणाऱ्या काळात दिसून येणारच आहे.
प्रभारी रश्मि खांडेकर यांनी विनय मून यांच्याकडे अधिकार पदाची सुत्रे सोपविली त्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व वरिष्ठ अधिकारी वर्गाने नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांचे स्वागत करुन सहकार्याचे आश्वासन दिले. महत्वपूर्ण बैठक असल्यामुळे अधिक प्रमाणात कार्यक्रम न थांबवता थोडक्यात आटोपता घेतला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नव्या व कायमस्वरुपी अधिकाऱ्याची असलेली प्रतिक्षा संपल्याचा दिलासा आता परभणी करांना मिळाल्याचे वाटणे स्वाभाविक आहे.