
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अचलपूर शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ,सुलतानपुरा येथील बालाजीपुरममध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला एकादश कुंडात्मक श्रीराम महायज्ञ व श्रीराम कथा आणि गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले अखिल भारतीय संत संमेलन गत दिवसांपासून पूर्ण विधी स्वरूप शेवटच्या दिवशी समारोप झाला.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी भागवताचार्य ह.भ.प.श्री.सुदामकृष्ण शास्त्री (पवन) यांचे द्वारा काल्याचे कीर्तन व ह.भ.प.श्री.कुंभ महाराज किरपाण (आळंदी) यांचे द्वारा जागरण कीर्तन केले.त्यानंतर या कार्यक्रमात विशेष उपस्थित असलेल्या रागिणी माताजी (किन्नर) व सहकारी मातांनी भाविकांना आशीर्वाद दिले तसेच हजारो भाविकांनी येथे आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला. पूर्णाहुती महायज्ञ, विशाल भंडारे आणि संत-ब्राह्मणांच्या निरोप प्रसंगी उपस्थित सर्व भाविक भावुक झाले आणि सर्वांनी पुष्पवृष्टी करून जुळ्या नगरीचा निरोप घेतला.
उल्लेखनिय श्री श्री १००८ श्री नर्मदादासी माता यांच्या संकल्पाने बालाजीपुरम,सुलतानपुरा कॉम्प्लेक्स,अचलपूर येथे महिनाभर चालणारे संत संमेलन व अकरावे कुंडात्मक श्रीराम महायज्ञ व संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले होते.ज्यात अन्नपूर्णा मंदिरातील मान्यवर उपस्थित होते.श्रीकृष्ण आश्रम,लवराही,हिमाचल प्रदेश आले.कथा वाचक श्री.१००८ श्री.महंत मोहनदासजी रामाणी महाराज येथे आयोजित संत संमेलनात देशाच्या विविध भागातून आलेल्या संत आणि संप्रदायाच्या आगमनाबरोबरच भाविकांना रामकथा कथन केले. कौडण्यपूर विदर्भ पीठाधीश्वर अनंत श्री.विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी,श्री.रामराजेश्वराचार्यजी महाराज (श्री समर्थ माऊली सरकार), श्री श्री १०८ महंत श्री शिवदासजी महाराज (रामेश्वरम, तमिळनाडू), महामंडलेश्वर १००८ श्री श्री रामप्रियवासी महाराज (टोंक,राजस्थान),श्री.श्री १०८ महंत अवधेशजी महाराज (रघुनाथ मंदिर,राजस्थान),श्री श्री १०८ महंत महामंडलेश्वर पुरुषोत्तमजी महाराज (जालंधर,पंजाब),महंत श्री वासुदेव महाराज (वृंदावन धाम), श्री श्री १०८ महंत श्री विष्णुजी महाराज (हिमाचल प्रदेश),आचार्य श्री सुदर्शन महाराज,श्री श्री १०८ श्री विष्णुमोहन महाराज (कुडू मनाली, हिमाचल प्रदेश),श्री श्री १०८ श्री राममाधवजी महाराज (कुल्लू मनाली,हिमाचल प्रदेश) इत्यादी अनेक संतांचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या उद्घाटना निमित्त अचलपूर आणि परतवाडा शहरात सर्व संतांची भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती आणि सर्व संतांना सजवलेल्या रथांवर बसवून नगर भ्रमंती करण्यात आली होती.ज्यात मोठ्या संख्येने संतांच्या दर्शनासाठी व पूजनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.तर या कार्यक्रमाची भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.सर्व धार्मिक विधी उरकवून श्री रामकथेची पूर्णाभूती करण्यात आली.त्यासोबतच बालाजीपुरममध्ये आयोजित केलेल्या रामकथेलाही आठवडाभर भाविकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.