
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी :देगलूर शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानकासमोर फळे व भाजीपाला फेरीवाले सकाळी सातपासून आपले हातगाडे लावत व ऑटो खाजगी वाहनामुळे नागरिकांना चालणे व वाहनधारकांना फिरणे अवघड झाले आहे. देगलूर जुनाबसस्थानकाच्या समोर मरखेल कडेखेल औराद मुक्रमाबाद जाणाऱ्या प्रवाशांसाठी खाजगी वाहनांचा ताफाच्या ताफा असतो त्यामुळे एसटी चालकास व शहरातील विद्यार्थ्यांना वृद्ध व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पण, याकडे ट्राफिक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे नागरिक हैराण तर फेरी वाले सैराट, असे चित्र पाहावयास मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले असताना नगर परिषद आमच्या हद्दीत नसल्याचे म्हणते. तर सार्वजनिक बांधकाम विभाग मला काय त्याचे, असे वागत आहे. यामुळे सर्वसामान्यांना रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे. या मुख्य रस्त्यावर यामुळे दररोज अपघात होत आहेत. नवीन बस स्टॅन्ड ते साठे चौकापर्यंत रस्ता हा दिसायला तर 40 फुटाचा आहे पण प्रत्यक्षात बघितलं तर दहा फुटाची रोड या खाजगी वाहने व फेरीवाले व ऑटो वाल्यामुळे दिसत आहे
यामुळे विद्यार्थी शाळेला व ट्युशनला सायकलवर जात असताना दररोज एक तरी अपघात होत आहे तसेच शहराच्या मध्यभागी लोहिया मैदान भाजी मार्केट अशा ठिकाणी तर पायी चालणे म्हणजे तारावली कसरत केल्यासारखी दिसत आहे
सर्व लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन आणि नगरपालिका कर्मचाऱी या रस्त्यावरून नेहमी ये जा करतात पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की जाणीव पूर्वक त्याकडे दुर्लक्ष करून या हातगाडी .ऑटो चालक व खाजगी वाहनधारक यांच्याशी संगणमत करून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत का असे देगलूर शहरातील नागरिकांच्या मनात कुठेतरी प्रश्न निर्माण झाला आहे. जरी हे नागरिकांच्या मनातला प्रश्न दूर करायचा असेल तर पोलीस कर्मचाऱ्यांनी व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी याकडे लवकरात लवकर लक्ष घालून शहरातील रस्ते चौक गल्ली कशा रीतीने खुले होतील व नागरिकांना यांचा त्रास होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर पोलीस व नगरपालिका यांच्यावर नागरिकांचा विश्वास कमी होईल असे वाटते.