
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मुखेड सा.वा मुखेड तालुक्याचे भूमिपुत्र आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते दलित पॅंथर चे कारकरते तथा आठवले गटाचे आरपीआयची जिल्हाध्यक्ष गौतम काळे यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याबद्दल व दलित समाजातील गोरगरीब लोकांच्या उथ्णाबद्दल गौरवास्पद कामगिरी केल्यामुळे भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार दिल्ली येथे त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की मुखेड तालुक्याचे भूमिपुत्र गौतम काळे यांनी आपल्या कॉलेज जीवनापासून आंबेडकर चळवळीत स्वतःला झोकुन देऊन त्यांनी या चळवळीत काम करत असताना दीनदलित पीडित शोषित लोकांना व शेतमजूर शेतकरी कष्टकरी निराधार परितत्का,विधवा महिलांना, वयोवृद्ध पुरुष व महिलांना न्याय मिळावा या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून अनेक मोर्चे व आंदोलने करून तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा ,आंदोलने काढून शेकडो गोरगरिबांना न्याय मिळवून दिला तसेच माता रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून अनेकांना शासनाचे घरकुल मिळून दिले तसेच दलित पॅंथरच्या माध्यमातून त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सहभागी होऊन मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच त्यांनी राजकारणात उडी घेऊन मुखेड शहरात गेल्या वीस वर्षापासून ते नगरसेवक असून त्यांनी अख्खरगा या मूळ गावी सुद्धा आपल्या कुटुंबात सरपंच पद हे मिळवले आहे तसेच मुखेड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व पुतळा व्हावा यासाठीमा.आ.किशनराव राठोड , शिवसेनेचे दशरथराव लोहबंदे, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार
यांच्या साथीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व पुतळा उभे केले तसेच मुखेड शहरातील समता नगर भागात स्वखर्चाने सम्राट अशोका बुद्ध विहार सभागृह व प्रार्थना स्थळ उभे केले आहे तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले याचे व मा.आ.कर्मविर किशनराव राठोड यांचे कट्टर समर्थक असुन त्यांनी वयाच्या ५५ वर्षिहि दिन दलीतासाठी निस्वार्थपणे कार्य करत असल्याबद्दल भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशीप पुरस्कार दिल्ली येथे भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .