
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याच्या मागणीने जोर धरला.
काल पुण्यात बंद पाळण्यात आला आहे. डेक्कन ते लालमहाल असा मोर्चाही काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. यात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसलेदेखील सहभागी झाले आहेत. पण बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायलयाने अनेकदा सांगितलं आहे की बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आलाय. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी, असं सदावर्ते म्हणालेत.