
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
विदर्भ ही संतांची कर्मभूमी म्हनुण ओळखली जाते.कोरपना तालु्यातील हीरापुर गावात वामन बाबा पावडे यांनी दी.६ आगस्त २०२१ रोजी अखंड उपवासाला सुरुवात केली होती.या अखंड उपवासाची वारी दि.६डिसेंबर २०२२ ला पूर्ण झाली.अखंड १६ महिने उपवासाला पूर्ण झाले असून अजूनही त्यांची उपवासाची वारी सुरू आहे.
उपवासाच्या वारीला १६ महिने पूर्ण झाल्या निमित्त दर्शन सोहळ्याचे आयोजन पंचमुखी नंदिगड सेवा समिती द्वारे करण्यात आले होते.या सोहळ्यात वामन महाराज यांनी प्रत्यक्ष सर्व भाविकांना संत विक्तुबाबा,गजानन महाराज,जगन्नाथ बाबा, स्वामी समर्थ महाराज,शिव अवतार, मंगरुळचे भालचंद्र बाबा,यासह विठ्ठलाचे दर्शन दिले.
दर्शना सोबतच महाप्रसादाचा
लाभ घेण्याकरिता तालुक्यासह जिल्हाभरातून भाविकांची मांदिआळी आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अनंता गोखरे,नागोबा मडचापे,उत्तम बोबडे,मोहन पावडे,मारोती गोखरे,संतोष मोहितकर,विष्णू पावडे,सुभाष गोरे,कमलाकर काळे,उमेश गोहकर,संदीप मोहीतकर,गजानन मडावी,अमोल पावडे यांनी परिश्रम घेतले.