
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कौठा ;- कौठा नांदेड येथील रामराव पाटील मेमोरियल एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित शंकर कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळाले आहे.ईयत्ता अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी करण सुरेश वैद्य हा अंडर १७ फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आलाआहे.त्याबद्दल त्यांचें व त्यांचे प्रशिक्षक प्रा.जाधव ए .जी. सर यांचे मा.आ.श्री.वसंतरावजी चव्हाण साहेब,आ.श्री.मोहन अण्णा हंबर्डे साहेब, नगरसेवक श्री.राजू पाटील काळे,श्री. आनंदराव पाटील चव्हाण, श्री.मोहनराव पाटील सुगावकर, संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य श्री गोविंदराव शं. मेथे साहेब, सचिव प्रा.श्री. तिरुपती मेथे साहेब, संस्थेचे सदस्य श्री इंजी .विलास पाटील ,महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.