
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनिधी- कवि सरकार इंगळी.
इंगळी गावातील अनेक पानंद रस्ते अत्यंत खराब व खाचखळ्याग्याचे असून सदर रस्त्यांचे खडीकरण व्हावे यासाठी इंचलकरंची मतदार संघाचे विध्यमान आमदार प्रकाशआण्णा ,आवाडे यांना निवेदन देणेत आले.
गावात मोठ्या प्रमाणात उस शेती असलेने ऊस हंगामात अनेक शेतकरीवर्ग यांना ऊसतोडणी वेळी रस्ते खराब असलाने लवकर तोडणी मिळत नाही.अनेक शेतकरीवर्ग हे रानात वस्ती असलेने पानंद रस्तेने गावात येणे जाणे अडचणीचे असते.रानात जनावरांचा गोठा असणारे शेतकरी महिलावर्गांना पानंद रस्यांने येणे जाणे अवघड असते. बरेच पानंद रस्ते हे काट्याकुट्याचे असलेने पावसाळ्यात तर राडीचिखलातूंन चालताना फार त्रास होत असतो.तरी लवकरात लवकर रस्ते व्हावेत अशी निवेदनाद्वारे मागणी करणेत आली.व गावातील इतर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे
यावेळी कवि सरकार इंगळी,श्रीमंधर चौगूले कुमार ऐतवडे शामराव भातमारे
भुपाल बिरांजे उपस्थीत होते