
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी
पुण्यात काम करताना संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवतानाच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. सायबर गुन्ह्यामध्ये तातडीने गुन्हे दाखल केले. परंतु गुन्ह्याचे प्रमाण इतके वाढत गेले की त्यात आणखीन काही करायचे राहून गेले. वाहतूक सुधारण्यासाठी खूप काही करायचे होते असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. पोलीस आयुक्त गुप्ता यांची मंगळवारी रात्री राज्यांच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अप्पर पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाली त्यानंतर बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुप्ता म्हणाले की पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील गणेशोउत्सव आणि पालखी सोहळ्यांचा बंदोबस्त अनुभव शब्दात सांगता येत नाही. या सोहळ्यांतील गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे नाही. शहराचा वाढता विस्तार वाहतुकीचा वाढतात ताण, शहराची रचना अशा अनेक बाबी विचारात घेवुन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यांस प्रथम प्रधान्य दिले. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना जबर बसवण्यासाठी मोक्का ,झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केल्या. सायबर मधील ८० टक्के गुन्हे हे दाखल पात्र असतात परंतु त्याचा प्राथमिक तपास करुन गुन्हे दाखल होण्यास वेळ लागतो. पुण्यात आणखीन पोलीस ठाण्याचे गरज पुणे शहराचा विस्तार पाहता मनुष्यबळापूर आहे पुण्यात आणखीन पोलीस ठाण्याची निर्मिती व्हायला हवी असेही गुप्ता यांनी सांगितले. पुण्यात आणखीन काम करण्याची इच्छा होती. परंतु नोकरी म्हटलं की बदली ही आलीच असेही गुप्ता म्हणाले माझ्यावर पुणेकरांचे प्रेम माझ्या कायम माझ्या स्मरणात राहील.