
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भू म:-शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि १७ रोजी व्हाईस ऑफ मीडियाच्या विविध पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या हक्कांविषयी लढा देणारी संघटना असून ही संघटना देशभर कार्य करत आहे.
व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे व जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.
भूम तालुका अध्यक्ष महावीर बनसोडे , उपाध्यक्ष अजित बागडे, प्रल्हाद अडागळे, कोषाध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, सरचिटणीस रोहित चंदनशिवे , सहसरचिटणीस नवनाथ यादव, कार्याध्यक्ष दत्ता अहिरे, प्रसिद्धीप्रमुख उदय साबळे, संघटक विश्वनाथ फल्ले , कार्यवाहक तानाजी सुपेकर, सदस्य प्रकाश सितापे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र लोमटे उपस्थित होते.