
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी.
इंगळी ग्रामपंचायत निवडणूकीत राजर्षी छ परिवर्तन आघाडीच्या उमेदवार सौ चंद्रकला दादासो मगदूम या निवडूण आल्या असून त्या सामाजिक कार्य करते शेतमजूरीचे काम करतात.गेल्या १५ वर्षापासून त्या लालबालटा कामगार शेतमजूर यांच्यासाठी त्यांच्या विविध मागणीसाठी आंदोलन करत असतात.वृद्धांची पेंन्शन,रेशनकार्ड,शासनाच्या योजना तळागाळात पोहचवणे या माध्यमातून त्यांनी अनेक कामे केलीआहेत. प्रथमपासून प्रभाग दोन मध्ये एकाच गटाचा बाल्ले किल्ला म्हणून प्रसिद्द असलेला यावेळेस प्रथम या बालेकिल्यात कोणाचेही पाठबळ नसताना सुद्धा त्या आपल्या स्वकर्तृत्वावर निवणून आलेने गावात अनेकांना धक्काच म्हणावा लागेल.