
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
माळेगाव यात्रेत चोरांचा सुळसुळाट झाला असुन अनेकांचे मोबाईल व पाॅकीट पाकीटमाराने लंपास केल्याच्या घटना घडत असुन चोरांचा बंदोबस्त करण्यास पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला दि. २२ डिसेंबर पासून देवस्वारीने झाली असून देवस्वारीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली असता या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी शासकीय विश्रामगृह व मुख्य रस्त्यावरील अनेकांचे मोबाईल व पाॅकीटावर पाकिटमारांनी डल्ला मारला आहे त्यामुळे यात्रेकरू मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असुन याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.