
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
………………………………………..
विष्णुपुरी येथील कै.किशनराव टिकारामजी देशमुख सार्वजनिक वाचनालयातर्फे जि.प.हायस्कूल विष्णुपुरी ता.नांदेड येथील पहिली ते दहावीपर्यंत च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम सोमवार दिनांक २६ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सु.ग.जाधव आणि वाचनालयाचे अध्यक्ष डाॅ.गोविंद हंबर्डे उपस्थित होते. या वेळी संस्कार व्याख्यान मालेतील व्याख्यानाचे एक पुष्प प्राचार्य जाधव यांनी गुंफले.मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य जाधव यांनी विद्यार्थ्यांना खेळ आणि अभ्यास याचा मेळ कसा घालावा हे गोष्टीतून गमतीदार पद्धतीने सांगीतले.
विद्यार्थ्यांची वाचन आवड वाढावी म्हणून ग्रंथालयातर्फे २६ विद्यार्थ्यांचा ग्रंथभेट आणि फुले देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना श्यामची आई , पुढे व्हा , म.गांधी, नेताजी,कल्पना
चावलाय,व्यक्तिमत्व विकास,हमखास इंग्रजी , टागोरांच्या गोष्टी, छत्रपती शिवाजी आदी पुस्तके भेट देण्यात आली. तसेच सदिच्छा फाउंडेशन शिष्यवृत्तीधारक दहावीचे विद्यार्थी वैष्णवी कवाळे आणि अभिषेक काळे यांचाही ग्रंथभेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.या दोन विद्यार्थ्यांचा अकरावी बारावीचा सर्व खर्च हे फाउंडेशन करणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्य़ातील एकून दोनशेपन्नास विद्यार्थी बसले होते यात विष्णुपुरी शाळेतील हे दोन विद्यार्थी पात्र ठरले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि पाहूण्यांचा परिचय डाॅ.गोविंद हंबर्डे यांनी करून दिला.
या वेळी शाळेतील मुख्याध्यापक नागनाथ दिग्रसकर, शिक्षक उदय हंबर्डे कृष्णा बिराजदर ,श्रीपाद वेदपाठक,डी के केंद्रे, एमजीएम चे केदार रोकडे वाचनालय कर्मचारी सचिन लुटे, विद्यार्थी सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एम.ए.खदीर यांनी केले तर वाचनालयाचे ग्रंथपाल प्रवीण हंबर्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.