
कारचा अक्षरश: चक्काचूर !
अभिनेता विजय देवरकोंडा सध्या रश्मिका मंदान्नासोबतच्या त्याच्या साखरपुड्यामुळे आणि लग्नामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याच्याबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडा सोमवारी अपघातातून थोडक्यात बचावला. हा अपघात हैदराबाद-बेंगळुरू महामार्गावर किंवा एनएच-४४ वर झाला, जिथे विजयच्या कारला मागून दुसऱ्या कारने धडक दिली.
विजयची प्रकृती कशी आहे?
अपघात झाला तेव्हा विजय देवरकोंडा पुट्टपर्तीहून हैदराबादला परतत होता. वृत्तानुसार, अभिनेत्याच्या कारचे नुकसान झाले आहे. पण, अभिनेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही. त्याच्यासोबत प्रवास करणारे सर्वजण सुरक्षित आहेत.
अशाप्रकारे तो हैदराबादला पोहोचला
तेलुगू अभिनेता विजय देवरकोंडा यांची कार आज पुट्टपर्तीहून हैदराबादला जात असताना जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातील उंडावल्ली येथे दुसऱ्या वाहनाशी धडकली. त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर विजय देवरकोंडाने त्याच्या मित्राच्या गाडीतून पुढचा प्रवास केला.
गाडीचे नुकसान झाले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अभिनेता विजय देवरकोंडा आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुट्टपर्तीहून हैदराबादला त्याच्या गाडीने जात असताना त्यांच्या समोरील एक बोलेरो कार अचानक उजवीकडे वळली, त्यामुळे त्याची गाडी बोलेरोच्या डाव्या बाजूला धडकली. गाडीच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले. परंतु कोणीही जखमी झाले नाही. विजय देवरकोंडा आणि इतर दोन लोक कारमध्ये होते. ते लगेच दुसऱ्या वाहनात बसले आणि त्यांच्या टीमने विम्यासाठी पोलिस तक्रार दाखल केली आहे.”
रश्मिकाशी लग्न
अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. तो अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत साखरपुडा झाल्याचे वृत्त आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हे दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.