
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील अंबुलगा जाणारी बस ही फक्त विद्यार्थ्यांसाठी धावणार व भूतनहिप्पगा बस इतर प्रवासासाठी धावणार , काही अडचणीमुळे अंबुलगा बस फक्त प्रवाशांना व विद्यार्थ्यांना घेऊन जात असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे लक्षात येतात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण राजकुमार बिरादार यांनी बस डेपो, तहसील कार्यालय, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन या रस्त्यावरती विद्यार्थ्यांसाठी व इतर प्रवासासाठी दोन गाड्या सोडावे अशी विनंती केली होती या विनंती व दैनिक चालू वार्ता पेपरच्या मार्फत वेळोवेळी पाठपुरावा करून बातमी संक्षिप्त केल्यामुळे संपूर्णपणे गांभीर्याने विचार करून एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि त्वरित त्याच्यावरती निर्णय घेऊन
त्या गावांना गाडी नियमित सोडण्यात आली आहे सोडले
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाले आहे.