
दैनिक चालू वार्ता अहमदपुर प्रतिनिधी-विष्णू पोले.
शासकिय गायरांन जमिनिवर अनुसुचित-जाती,जमातीच्या लोकांनी उपजिवीकेकरिता केलेले अतिक्रमण नियामानुकुल
करावे या मागणीसाठी जमिन अधिकार अंदोलन व वंचीत हक्क अंदोलन महाराष्ट्राच्या वतीने अहमदपूर तहसील कार्यालया समोर गुरुवार (दि.29/12/2022) रोजी एक दिवसीय धरणे सत्यागृह करण्यात आले.
महाराष्ट्रात सर्वप्रथम जमिन अधिकार अंदोलनाची चळवळ उभी करणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मृतीदिना निमित्त गुरुवार (दि.29/12/2022) रोजी अहमदपूर तालुक्यातील शासकिय गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अनुसुचित जातीच्या लोकांनी महाराष्ट्रात निजाम काळापासून भूमिहिन लोक पडीक गायरान जमिनी वहिती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.त्यांचे गायरान पट्टे नियमाकुल करण्या ऐवजी राज्य सरकार ही जमीन काढून घेण्यासाठी नोटिसा बजावत आहे.तर दुसरी कडे धनदांडग्यां उद्योगपत्तींना हजारो एकर जमिनी उद्योगांच्या नावावर देत आहेत, सत्तेत असलेले आमदार मंत्री जवळच्या बगल बच्छ्यांना अनाधिकृत सरकारी जमिनी वाटत आहेत.ज्यांच्याकडे उपजिविकेकरिता कसलेच शाश्वत साधन नाही.शाश्वत साधन नसल्यामुळे अनुसुचित जाती जमातीच्या लोकांची उपासमारी होत आहे.पण शासन पडीक खडकाळ जमिनीवर उदरनिर्वाहा करिता केलेले अतिक्रमण काढून घेण्याकरिता ताकदीनिशी
आमंलबजावणीचा सपाटा लावीत आहे.शासनाचा हा डाव उधळून लावण्या करिता आणि गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमणे नियमाकुल करावीत, नियमाकुल करण्याचा कायदा करावा,शासकीय जमिनीवर असलेले गरिबांची घरे त्यांचे नावे करावेत,घरकुलासाठी शासकीय जागा द्यावी,
संजय गांधी निराधार,श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्याना दरमहा ३ हजार रुपये सुरु करावे,त्यासाठीची २१ हजाराच्या उत्पन्नाची अट रद्द करावी,या मागणी करिता
जमिन अधिकार अंदोलन व वंचीत हक्क अंदोलन महाराष्ट्राचे बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो गायरानधारकांनी एकदिवसाचे धरणे सत्यागृह अंदोलन केले.या वेळी मच्छिंद्र गोजमे, सुनिल खंडाळीकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, आमरत भोगे, सुर्यकांत कोकाटे, भगवान ससाने, मंगल श्रीमंगले, मंचक शिंदे, अविनाश शिंदे, वैजनाथ मुसळे, राजाराम नामपल्ले, अदिसह शेकडो महिला पुरुष गायरानधारक धरणे सत्यागृहात सहभागी होते.