
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:सप्तगिरी पोदार जम्बो किडस् देगलूर या शाळेत वार्षिक विविध खेळ स्पर्धा आज दिनांक 29.12.2022 रोजी
शाळेच्या प्रांगनामध्ये उत्सहात साजरा करण्यात आला. या खेळाच्या माध्यमातून बालवयातील मुलांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये मैदानी खेळांचे आवड निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त पणे सहभाग घेऊन विवि स्पर्धाचे प्रदर्शन सादर केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्रामाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संग्राम जाधव साहेब व विषयतज्ञ, गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती, देगलूर येथील श्री दत्ताजी पांचारे सर उपस्थित राहून मुलांचे मनोधैर्य वाढवले तसेच जाधव साहेबांनी आपल्या भाषनातून मैदानी खेळाचे महत्व विद्यार्थी व पालकांना पटवून दिले. तसेच या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्गाची उपस्थिती होती. तेंव्हा उपस्थित पालकांच्या सुध्दा काही स्पर्धा
घेण्यात आल्या त्यामध्ये धावणे या स्पर्धेत पुरूष गटामध्ये श्री दलीत सुधाकर कागदे हे प्रथम तर श्री नितीन बामने हे द्वितीय व
श्री सय्यद अन्वर है तृतीय क्रमांक पटकावला तर महिला गटात सी, आकांक्षा कोरेवार या प्रथम तर सौ. लक्ष्मी तितरमारे या
द्वितीय आणि सौ. प्रणाली डोंगरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र
देऊन सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री दिगंबर शेकापूरे सर, जम्बो किड्स् च्या मुख्याध्यापीका ऋतिका नागेश्वर व जंम्बो किडस् चे सौ.
पाटील मॅडम, सौ. येरमुने मॅडम व देशमुख मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे क्रीडा
शि क्षक आकाश सरांचे
मोलाचे योगदान लाभले.