
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अमरावती जिल्ह्यात बाल विवाह मुक्त जिल्हा अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.या पार्श्वभूमीवर मंगळवार,दि.३ जानेवारी २०२३ रोजी बालिकादिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्रत्येक गावात सकाळच्या सत्रात बाल विवाह मुक्त जिल्हा अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रत्येक गावात बाल विवाह मुक्त जिल्हा अभियान रॅली ही विद्यार्थी,ग्राम बाल संरक्षण समितीची सदस्य,ग्रामपंचायतीचे सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांच्या सहभागाने आयोजित करण्यात येणार आहे.बाल विवाहाबाबत जनजागृती करण्यासाठी बालकांचे हक्क,बाल विवाहाचे कायदेशीर वय, ‘बाल विवाह करणार नाही’ आणि ‘होऊ देणार नाही’ अशा घोषवाक्यांचा समावेश राहील.तसेच प्रत्येक गावात बाल विवाह होऊ देणार नाही,असा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे.