
दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
जि.प.हायस्कूल मुलींचे मुखेड येथील प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व नुतन व माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दि.२९ डिसेंबर रोजी शाळा व्यवस्थापनाची बैठक संपन्न झाली सदर बैठकीत समितीचे पदाधिकारी, विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविलेले विद्यार्थी व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक-शिक्षिकांचा शा.व्य.समिती व शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा.व्य.समितीचे अध्यक्ष महेताब शेख होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी अध्यक्ष शिवाजी गेडेवाड, मुख्याध्यापक एम.आर. कांबळे, केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड, दिपक लोहबंदे, शिवाजी कराळे, श्रीपत वाडीकर, जयभिम सोनकांबळे, संजीव बिडवई, संजय यलमवाड, अॅड. मिलिंद कांबळे, अनिल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण इंगळे यांनी तर सुत्रसंचलन सविता उमाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार सहशिक्षक व्यंकटी केंद्रे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाची सुरूवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमादरम्यान आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षक व शिक्षिकेचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच शिक्षण सहकारी पंतसंस्थेच्या निवडणुकीत यश मिळविलेल्या सहशिक्षक दिलीप देवकांबळे यांचा सन्मान त्यानंतर पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत ६ विद्यार्थीनिंनी द्वितीय क्रमांक मिळविला तसेच भुमिका अभिनय स्पर्धेत ४ विद्यार्थिनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला त्याचबरोबर राज्यस्तरिय बाल विज्ञान परिषदेसाठी राज्यस्तरावर ०४ विद्यार्थ्यांची निवड तसेच विरबाल दिवस या निबंधस्पर्धेत जिल्हास्तरावर सहभाग घेतलेल्या २ विद्यार्थीनीं, रायफल शुटींग, एअर पिस्टल स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड झालेली एक विद्यार्थीनी तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धेत तालुकास्तरावर यश मिळविलेल्या ३ विद्यार्थिनी असे एकून २१ विद्यार्थ्यांनीचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर शा.व्य.समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत शाळेच्या संदर्भात असलेल्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी शा.व्य.समितीचे उपाध्यक्ष उर्मिला गित्ते, सदस्य सुनील तरगुडे, नंदकुमार काचावार, हणमंत नरोटे, रूक्मिण पंदिलवाड, श्रीदेवी पांचाळ, शिवमाला धर्मापुरे, सरदारबेगम पठाण, पुजा संगमवाड, लक्ष्मीबाई यलमवाड, अर्चना वाघमारे, रेश्मा उतकर, भवानीसिंह चौहाण, संतोष मठपती, अन्वर अत्तार, गंगाधर घायाळे, गौतम गवळे, अश्विनी कुलकर्णी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.