दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा. पारंपारिक पिकाला फाटा देत शेतकरी वेगवेगळ्या पिकाची लागवड करतोय. परंतू शेतमालाला भाव मिळत नाही. पिकाच्या उत्पादनाचा खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरीही आता कोणत्या पिकाची लागवड करू, या विचारमंथनात सापडलेला आहे.मिळेल, काही शेतकऱ्यांनी वांगी,
टमाटरला यावर्षी चांगला भावमिळेल या आशेने टमाटरची लावगड केली.
भरघोस उत्पादन होत आहे. परंतू बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या टमाटरला दोन ते तीन रुपये किलो भाव मिळत आहे. तोडणीचा खर्च निघत नाही.या याशिवाय बाजारात वाहणाने आणण्याचा खर्च वेगळा येतो या मुळे घेता विकत नाही वाटतो
फुकट अशी म्हणण्याची वेळ टमाटर उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.
तालुक्यात अनेक भागात भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड शेतकरी करतोय वांगी, गोबी, मिर्ची या भाजीपाल्या बरोबर टमाटरची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे मागील दोन वर्षापूर्वी टमाटरला चांगला भाव मिळाला. मात्र त्यानंतर टमाटरला घसरण सुरु झाली आहे. वातावरण बदलामुळे गहू, हरभरा पिकावरही रोगराईचे सावट आले त्यामुळे शेतकरी विचारमंथन करीत आहेत.
