दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
नांदेड_ आज नांदेड येथील प्रेमनगर मध्ये इंजिनिअर अजय पाठक यांच्या राहत्या घरी देवीची नवचंडी हा कार्यक्रम आज घेण्यात आला.सदरील हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून सदरील देवीच्या मंत्रोपचाराने सर्व परिसर भक्तीमय झाला होता.
देवीचे मंत्र , सप्तशतीचे पाठ आरत्या, गोंधळ व जोरदार संबळ त्यामुळे खूप आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदरील कार्यक्रमात अनेक ब्राह्मणांचा सहभाग होता. विशेषत: या कार्यक्रमाला भास्कर पाठक,अजय पाठक, उत्कर्ष पाठक, उपेंद्र पाठक, नागेश लव्हेकर,मनोज लव्हेकर,अनुराग लव्हेकर,सो.अश्विनी लव्हेकर,सो.अश्विनी सरवदे,संजय सरवदे,सो.अलका कुलकर्णी,सुनील कुलकर्णी,सो.अनिता चौधरी,अरविंद चौधरी,डॉ. पाठक ,सो.पाठक उपस्थित होते घरी.
