दैनिक चालू वार्ता नाशिक प्रतिनिधी: संभाजी पुरीगोसावी
नाशिक जिल्ह्यांतील निफाड तालुक्यांतील उगावचे रहिवासी असलेले आणि मरळगोई येथे राहणारे भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यांवर असताना वीरमरण आले. याबाबत ढोमसे यांच्या कुटुंबीयांना फोन द्वारे ही माहिती देण्यांत आली. त्यामुळे उगाव, मरळगोई या गावासह परिसरांतील गावात शोककळा पसरली. निफाड तालुक्यांतील उगाव येथील रहिवासी उत्तम बाबुराव ढोमसे यांचे सुपुत्र असून जनार्दन यांचे प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ शिक्षण हे उगाव येथे झाले होते. १२ वी नंतर जनार्दन यांनी लातूर येथे भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अकॅडमी प्रवेश घेतला होता.२००६-२००७ मध्ये सर्वप्रथम कच्छ, भुज त्रिपुरा,आसाम आणि आता जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. तीन वर्षानंतर त्यांची सेवा संपणार होती. त्यांचे वडील उत्तम बाबुराव ढोमसे हे शेती व्यवसाय निमिंत्त मरळगोई येथे स्थलांतरित झाले होते. त्यांच्या पश्चांत आई वडील आजी आजोबा, पत्नी रोहिणी व मुलगा पवन (वय वर्ष ८) मुलगी आरु (वय वर्ष २) असा त्यांचा परिवार होता. त्यांच्या अचानक जाण्यांमुळे ढोमसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जनार्दना लहानपणापासून देशसेवेची आवड होती शिक्षण सुरु असताना त्यांचा कल सैन्य दलाकडेच होता सेवा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना वीरमरण आले. १ जानेवारीला ते आपल्या गावी सुट्टीवर येणार होते. जवान जनार्दन ढोमसे सुट्टीवर येण्यापूर्वीच अखरेचा निरोप घेतल्यांने परिसरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद जवान जनार्दन ढोमसे शहीद झाल्यांचे वृत्त उगावचे महिला पोलीस पाटील सौ.विद्या त्रिंबके यांनी दिली.
