
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी मुखेड आणि शिवकुमार बिरादार यांची ग्रामीण प्रतिनिधी म्हणून निवड होताच मुखेड येथील जिजाऊ ज्ञान मंदिर चे संचालक जगदीश जोगदंड नामांकित स्कॉलर किड्स चे ज्ञानेश्वर पाटील , मुखेड येथील एकमेव प्रसिद्ध राजमाता जिजाऊ होस्टेलचे संचालक गंगाधर बिरादार व तसेच आदर्श सहशिक्षक मोहन अंदुरे,प्रभाकर जाधव हे सर्व मान्यवर सत्कार प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित होते सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलताना आदर्श शिक्षक मोहन अंदुरे म्हणाले की दैनिक चालू वार्ता हा ऑनलाइन पेपर अतिशय उत्कृष्ट मांडणीचा आणि लवकर उपलब्ध होणार आहे येणाऱ्या काळात हा पेपर ब्रँड झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण तन-मन-धनाने अतिशय उत्कृष्ट कार्य करावे या माध्यमातून शहर गावातील गोरगरीब वाडी, वस्ती तांड्याचे प्रश्न सोडून लोकांना न्याय मिळवून द्यावा असे म्हणाले तेव्हा उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रतिनिधीचा यथोचित सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे सांगता केली शेवटी आभार सहशिक्षक प्रभाकर जाधव यांनी मानले