
दैनिक चालु वार्ता ता. मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून या निवडणुकीत शिक्षक एकता पॅनलने 15 पैकी 12 जागी विजय प्राप्त करून या पतसंस्थेवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे.यात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य चिटणीस दिलीपराव देवकांबळे व सौ.संगीता माळगे-फसमले यांचा प्रचंड मतांनी विजय झाला.
अखिलचे राज्याध्यक्ष देविदासराव बसवदे,शिक्षक संघाचे नेते जीवनराव वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समविचारी शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन शिक्षक एकता पॅनलच्या माध्यमातून सत्ताधारी मंडळीसमोर तगडे आव्हान निर्माण केले होते.दिनांक 27 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीनुसार शिक्षक एकता पॅनलच्या 15 पैकी 12 उमेदवारांनी विजय प्राप्त केला असून 3 उमेदवारांचा अल्प मतांनी निसटता पराभव झाला आहे.
शिक्षक एकता पॅनलच्या यशस्वीतेसाठी श्री.जी.सी चव्हाण, डि.के.तोटरे,एम.आर. कांबळे,दीपक लोहबंदे,भागवत पाटील,भाऊसाहेब पाटील, तुळशीराम केंद्रे,संजय तमशेट्टे, एकनाथ डुमणे,शिवाजी कराळे, मधुकर गायकवाड,श्रीपत वाडीकर,गजानन पाटील,गजानन पवितवार,सोमनाथ कुंभार, राजकुमार पंदरगे,निळकंठ बाजगिरे,नामदेव धनगे,दिगंबर नाईक,नामदेव सूर्यवंशी,नरसिंग जाधव सुरेश,गंगाधर जाधव, शिवाजी कांबळे,मोहन मुंडकर,संजय शिवशेट्टे,सुभाष दिग्रसकर,जे.एन.राठोड, बालाजी पाटील,डी.डी.वडजे पंढरी भालेराव,हरि भालेराव,खयूम शेख,सय्यद अली,माधव पोतंगले, माधव हिवराळे,देवराव सोनटक्के आत्माराम खांडगावे,शाम नंदू राठोड,दिनबंधू बनसोडे,सूर्यकांत दासरवाड,अशोक हलबुर्गे,गोपाळ बर्गे,वसंत शिंदे,दिगंबर अंकलगे, माधव जाधव,श्रीराम कदम,व्यंकट केंद्रे प्रकाश डोईजड,कल्याण पाटील इंगळे, डॉ.बरकत उल्ला,नामदेव सूर्यवंशी, मारुती सूर्यवंशी,संजय कोटगिरे,बळवंट डावकरे,शिवाजी पाटील इंगोले,शिवाजी पाटील इंगोले,सय्यद अली,चंद्रकांत कडकंजे,मनोज अंदुरे,कैलास बिरादार,मारुती डुकरे,मारोती घाटे,कैलास कोंडलवाडे यांच्यासह सौ.सुनंदा पाटील,सिंधुताई अटके,गोदावरी तलवारे,लता तोटरे,सरिता गवलवाड,रंजना घोटे,लक्ष्मी घाटे, सरस्वती मुपडे,कमलबाई वसमते,अश्विनी कुलकर्णी,आशालता स्वामी, मधुमती लोणीकर,सुनिता आलमले,संगीता पाटील,स्वरूपा मुळे,सुचिता कुलकर्णी इत्यादींनी परिश्रम घेतले.
या निवडीने समाज, सर्व क्षेत्रातील मित्र परिवार , शिक्षक वर्ग यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे ….