
दैनिक चालू वार्ता अहमद्पुर प्रतिनीधी -विष्णू पोले.
जेष्ठ स्वतंत्र्य सेनानी ,माजी खासदार,माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनानंतर मल्हार युवक संघटना संस्थापक अध्यक्ष तथा युवा नेते राजीव पाटील मुकनर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाई केशवराव धोंडगे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की महराष्ट्राने एक अभ्यासू, लढवय्या ,तळागाळातील प्रश्नाची जान असणारा चळवळीच्या माध्यमातून सरकार् वर वचक ठेवणारा ,मान्याड खोऱ्याचा बुलंद आवाज आपण गमावला.
तब्बल सात वेळा आमदार आणी एक वेळेस खासदार अशी पद भूषवीत असताना समाजिक,राजकीय,शैक्षणिक,आणी कामगार चळवळीत आपल खूप मोठ योगदान दिल.लोहा कंधार विधानसभा मतदार संघाच नेतृत्व करून अनेक प्रश्न मार्गी लावून जन माणसाच्या मनात घर करून गेलेला नेता म्हणजे भाई केशवराव् धोंडगे.
आयुष्यभर एकाच विचारसरणीशी एकनिष्ठ राहून आपल्या जीवनातील तत्व कायम जपले.नांदेड जिल्हा आणी महाराष्ट्रभर भाई म्हणजे शेतकरी चळवळीचा आक्रमक चेहरा म्हणून महाराष्ट्रभर त्यांचा लौकिक होता. अंत्यन्त अभ्यासु ,समाजासाठी दिनदलित,दुबळे,वंचित,कामगार,शेतकरी,विद्यार्थी या प्रत्येकाच्या प्रश्नाची नाडी जानणारा आणी त्यांच्या प्रश्नासाठी लढा उभा करणारा ,आंदोलन,मोर्चे,काढून शासन दरबारीं प्रश्न सोडवण्यासाठी लढा देणारा नेता प्रसंगी अनेक वेळा लाठ्या काठ्या आपल्यावर झेलून प्रश्न मार्गी लावून जनतेच्या मनावर अनेक वर्ष राज्य करणारा लोक नेता आज काळाच्या पडद्याआड गेला.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.त्यांच्या कुटूंबिया सोबत आमच्या शोक भावना आहेत.मी माझ्या संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.शतशः नमन